म्हणउनी खेळ मांडियेला – संत तुकाराम अभंग – 216
म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा ।
नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥
माझिया गोतें हें वसलें सकळ ।
न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥
करूनि ओळखी दिली एकसरें ।
न देखों दुसरें विषमासी ॥२॥
तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा ।
स्थिति मति देवा वांचूनियां ॥३॥
अर्थ
परमार्थाच्या या मांडलेल्या खेळात कोणतीही दिशा मी वगळलेली नाही .माझ्या परमार्थाचे हे गणगोत विठोबा आहे, त्यामुळे तिथे विटाळाला, भेदभावाला थारा नाही .त्याने मला माझी खरी ओळख करुण दिली आहे, मी विठ्ठलस्वरूपच असल्यामुळे इतर काही पाहतच नाही .तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठालाशी बांधला गेल्यामुळे मला काळाची भीती नाही .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
म्हणउनी खेळ मांडियेला – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.