शोकें शोक वाढे – संत तुकाराम अभंग – 215
शोकें शोक वाढे ।
हिमतीचे धीर गाढे ॥१॥
येथें केले नव्हे काई ।
लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥
करिती होया होय ।
परी नव्हे कोणी साह्य ॥२॥
तुका म्हणे घडी ।
साधिलिया एक थोडी ॥३॥
अर्थ
एखाद्या गोष्टीचा शोक केला तर तो वाढतच जातो, त्याकारता धीर धरला पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे .हे माझ्या बंधुंनो या मानवी जीवनात कोणतीही गोष्ट न घडण्यासारखी नाही,येथे भित्रेपणा वाइट आहे .परमार्थ करण्यास तुम्ही सहाय्य कराल काय? हा प्रश्न मी कित्तेकांना विचारला असता ते म्हणतात, करू हो! असे केवळ हो म्हणणारे लोक खुप आहे ; पण प्रत्यक्ष मदतीला धाउन येणारे लोक कमी आहेत .तुकाराम महाराज म्हणतात, या क्षणभंगुर जीवनात भक्तीचा एक जरी क्षण साधला तरी जीवन सफल होईल .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
शोकें शोक वाढे – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.