ध्यानी योगीराज बैसले कपाटीं ।
लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥
तहान भुक त्यांचें राखे शीत उष्ण ।
झाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥
कोण तया सखें आणीक सोयरें ।
असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥
कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद ।
नाहीं राज्यमद घडी तयां ॥३॥
तुका म्हणे विषय अमृतासमान ।
कृपा नारायण करितां होय ॥४॥
अर्थ
योगी, तपस्वी, साधू ईश्वर चिंतन करीत डोंगरकपारित ध्यानस्त बसलेले आहेत, त्यांचे रक्षण सदैव तो परमेश्वर करीत आहे .त्यांची तहान-भूक भागऊन, त्यांचे चित्त देहभावाविषयी उदासीन करीत आहे .त्यांना हरी शिवाय कोणतेही सगे-सोयरे नाहीत .तेथे त्यांच्या जीवाला आनंद वाटत आहे, राज्याभिलाशा त्यांच्या मनात शिवतहि नाही .तुकाराम महाराज म्हणतात, त्या नारायणाची कृपा झाली म्हणजे विष अमृतासमान होते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.