आचरणा ठाव – संत तुकाराम अभंग – 211

आचरणा ठाव – संत तुकाराम अभंग – 211


आचरणा ठाव ।
नाहीं अंगीं स्वतां भाव ॥१॥
करवी आणिकांचे घात ।
खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥
श्वानाचियापरी ।
मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥
तुका म्हणे ऐसा ।
सटवेचि ना पांचा दिसां ॥३॥

अर्थ
ज्याचे आचरण शुद्ध नाही, ज्याच्या मनात देवाविषयी भक्ती-श्रद्धा नाही .असे मुर्ख पंडित इतरांच्या शुद्ध आचरणात दोष काढतात व त्यांचा घात करतात .ते मिष्टान्नाला शिवून विटाळ करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात .तुकाराम महाराज म्हणतात , असा पाखंडी इतके दिवस जिवंत कसा राहिला? पाच दिवसांतच कसा मेला नाही ?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आचरणा ठाव – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.