देव आड आला ।
तो मी भोगिता उगला ।
अवघा निवारला ।
शीण शुभ अशुभाचा ॥१॥
जीवशिवाचें भातुकें ।
केलें क्रीडाया कौतुकें ।
कैचीं येथें लोकें ।
हा आभास अनित्य ॥ध्रु.॥
विष्णुमय खरें जग ।
येथें लागतसे लाग ।
वांटिले विभाग ।
वर्णधर्म हा खेळ ॥२॥
अवघी एकाचीच वीण ।
तेथें कैचें भिन्नाभिन्न ।
वेदपुरुष नारायण ।
तेणें केला निवाडा ॥३॥
प्रसादाचा रस ।
तुका लाधला सौरस ।
पायापाशीं वास ।
निकट नव्हे निराळा ॥४॥
अर्थ
देवच आड होऊन सर्व भोग भोगत आहे आणि शुभ व अशुभाचा जो विचार आहे त्याचे निवारण झाले आहे.जीव व शिव यांचे भातुकली प्रमाणे क्रीडा करण्या करिताच देवाने लीलेने यांची निर्मिती केली आहे मग येथे हा सर्व आभास अनित्य आहे.खरे तर हे सर्व जग विष्णूमय आहे आणि वर्ण आणि धर्म हे वाटणी जी दिसते हा खेळ त्या देवाचाच आहे.आहो हे सर्व एका देवा पासूनच निर्माण झाले आहे मग तेथे भिन्नतेचा प्रश्नच कोठे?हा निर्णय वेद पुरुष नारायण यानेच केला आहे.तुकाराम महाराज म्हणतात प्रसाद रुपी आंनद मला लाभला असून मी या हरीच्या पायाशी निरंतर राहून तेथुन निराळा होणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.