गर्भाचें धारण ।
तिनें वागविला सिण ॥१॥
व्याली कुर्हाडीचा दांडा ।
वर न घालीच तोंडा ॥ध्रु.॥
उपजला काळ ।
कुळा लाविला विटाळ ॥२॥
तुका म्हणे जाय ।
नरका अभक्ताची माय ॥३॥
अर्थ
नास्तिकाचा गर्भ धारण करून त्याच्या मातेने निष्कारण कष्ट केले .तिने जणू काही कुर्हाडीच्या दांडयाला जन्म दिला आहे, जन्मल्या बरोबर तिने त्याला मारून का टाकले नाही? तिच्या पोटी जणूकाही काळ जन्माला आला आहे आणि त्याने कुळाला बट्टा लावला आहे .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या अभक्ताची आई नरकात जाते .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.