कैसा सिंदळीचा – संत तुकाराम अभंग – 207

कैसा सिंदळीचा – संत तुकाराम अभंग – 207


कैसा सिंदळीचा ।
नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥
वाचे नुच्चारी गोविंदा ।
सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥
कैसा निरयगांवा ।
जाऊं न पवे विसावा ॥२॥
तुका म्हणे दंड ।
कैसा न पवे तो लंड ॥३॥

अर्थ
ज्याची वाणी अमंगळ आहे, तो निश्चितच जारिणीपोटि जन्माला आला आहे .तो नेहमी परनिंदा करतो, त्याची वाणी कधीही गोविंदाचे नामस्मरण करीत नाही .त्यामुळे तो अंती नरकाला जातो आणि तिथे गेल्यावर त्याला विश्रांती कशी मिळणार ? तुकाराम महाराज म्हणतात , असा तो धर्मद्वेशी यमाच्या दंडास पात्र ठरणाराच ना .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


कैसा सिंदळीचा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.