अमंगळ वाणी ।
नये ऐकों ते कानी ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा ।
त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥
याति वर्ण श्रेष्ठ ।
परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥
तुका म्हणे पाप ।
माय नावडे ज्या बाप ॥३॥
अर्थ
अमंगळ वाणी कानानि कधीही एकु नये .जो हरिकथेचा द्वेष करतो, त्याला क्षयरोगाची व्याधि होते .असा पुरुष उच्च जातीचा असला तरी तो पापी चांडाळ समजावा .तुकाराम महाराज म्हणतात, तो मनुष्य म्हणजे साक्षात पाप आहे, त्याला स्वतःचे मायबापही आवडत नाही .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.