याजसाठीं भक्ति ।
जगीं रूढवावया ख्याति ॥१॥
नाहीं तरी कोठें दुजें ।
आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥
गौरव यासाठी ।
स्वामिसेवेची कसोटी ॥२॥
तुका म्हणे अळंकारा ।
देवभक्त लोकी खरा ॥३॥
अर्थ
या जगातील सामान्य जीवांना तारण्यासाठी साधा-सोपा भक्तीमार्ग दृढ करण्याची गरज आहे .नाही तरी या जगामध्ये एका विठ्ठला शिवाय दूसरे दैवत कोठे आहे ? या साध्या सोप्या भक्तीचा गौरव होण्यासाठी किर्तीसाठी स्वामीसेवेचि कसोटी आहे .तुकाराम महाराज म्हणतात , देव व भक्त हा समाजातील एक खरा अलंकार आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.