ऐसे ऐसियानें भेटती ते साधु – संत तुकाराम अभंग – 202

ऐसे ऐसियानें भेटती ते साधु – संत तुकाराम अभंग – 202


ऐसे ऐसियानें भेटती ते साधु ।
ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ।

जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु ।
जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु ।
सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।

भूतकृपा मोडीं द्वेषकंदु ।
शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं ।
रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।

लघुत्व सर्वभावें अंगीकारीं ।
सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥
अर्थकामचाड नाहीं चिंता ।
मानामान मोह माया मिथ्या ।

वर्ते समाधानीं जाणोनि नेणता ।
साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥
मनीं दृढ धरीं विश्वास ।
नाहीं सांडीमांडीचा सायास ।

साधुदर्शन नित्यकाळ त्यास ।
तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥

अर्थ
जे आपल्या आनंदात निमग्न असतात, इश्वरचिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते, त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अश्या साधुंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भव बंध तुटतात.त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठेव कारण,त्यांच्या ठिकाणी स्थीरबुद्धि , नास्तिक्यभेद करणारी बुद्धि आहे. भूतदया धर मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक, शत्रु, मित्र, पुत्र या सर्वां प्रती समभाव धरअरे तू सर्वभावे लहानपणाचा अंगीकार कर अरे तू मी तू पणा चा लहान मोठेपणा चा त्याग कर .शरीर, वाणी, मन आणि बृद्धि शुद्ध असावी.सर्वत्र विठ्ठालाचे स्वरुप पहावे , विनम्रता असावी, अहंकार नसावा .ज्याच्या मनी धन, कामवासना नाही, मान सन्मानाचा मोह नाही , जो समाधानी वृत्तीचा आहे, त्याला संतसज्जन आनंदाने भेटतात .तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा, आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंच्याला विटला आहे, ज्याने आवड निवड टाकून दिली आहे, त्याला संत सज्जन नित्य भेट देतात साधू दर्शन नित्य घडते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


ऐसे ऐसियानें भेटती ते साधु – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.