दुजे खंडे तरी – संत तुकाराम अभंग – 20

दुजे खंडे तरी – संत तुकाराम अभंग – 20


दुजे खंडे तरी ।
उरला तो अवघा हरी ।
आपणाबाहेरी ।
न लगे ठाव धुंडावा ॥१॥
इतुलें जाणावया जाणा ।
कोंड तरी मनें मना ।
पारधीच्या खुणा ।
जाणतेणेचि साधाव्य ॥ध्रु.॥
देह आधीं काय खरा ।
देहसंबंधपसारा ।
बुजगावणें चोरा ।
रक्षणसें भासतें ॥२॥
तुका करी जागा ।
नको वासपूं वाउगा ।
आहेसि तूं अंगा ।
अंगीं डोळे उघडी ॥३॥

अर्थ
ज्ञान मिळाल्यामुळे द्वैतभावनेचा निरास होतो, सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे , हे ध्यानात येते; त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो .हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मारामची ओळख पटउन घेतली पाहिजे ज्या प्रमाणे परध्याची कला पारध्यालाच अवगत असते, तसे विष्णुदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते .विषयवासनेमधे गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देहासंमंधीचा पसारा खारा की खोटा हे लक्ष्यात येते जसे शेतीतिल बुजगावने चोराला पिकाचे रक्षण करणारे वाटते, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो .तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा, जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाला ओळख पटउन घे; कारण तूच परमेश्वरस्वरूप आहेस .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


दुजे खंडे तरी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.