नये जरी तुज मधुर उत्तर – संत तुकाराम अभंग – २
नये जरी तुज मधुर उत्तर ।
दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल ।
येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥
देवापाशीं मागें आवडीची भक्ति ।
विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥
तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥
अर्थ:-
देवाने गोड स्वर दिला नसला, मला गोड गळ्याने तुझे स्वर गाता येत नसले तरी काही हरकत नाही.विठ्ठल त्या वाचून भूकेला नाही जसा जमेल तसा “राम कृष्ण” हा मंत्र जप .श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्तिपूर्ण आळवनि कर .तुकाराम महाराज म्हणतात हे मना तुला मी सांगतो ते तू ऐक की हरी विषयी तू दृढ निर्धार धर.
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.