काय उणें आम्हां विठोबाचे पाई – संत तुकाराम अभंग – 199
काय उणें आम्हां विठोबाचे पाई ।
नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥
ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन ।
बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा ।
आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावीं ।
फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥
अर्थ
आम्हाला विठ्ठलाच्या पायाजवळ काय कमी आहे; आम्हाला तेथे कोणतीही उणीव भासत नाही .हे सुख सोडून इतरांच्या दारोदारी सुख शोधण्यासाठी आम्ही भिकाऱ्यासारखे भटकत नाही .माझ्या विठ्ठला पेक्षा बलवान दुसरा कोणीही नाही .तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठालाच्या गावी मोक्षाची कोठारे आहेत, त्याची लयलुट करा .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
काय उणें आम्हां विठोबाचे पाई – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.