अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक – संत तुकाराम अभंग – 198

अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक – संत तुकाराम अभंग – 198


अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक ।
तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥
आपुलालें तुम्ही करा रे स्वहित ।
वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥
देखोनि जीवन जरि जाय तहान ।
तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥
देखोनियां छाया सुख न पाविजे ।
जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥
हित तरी होय गातां अईकतां ।
जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥
तुका म्हणे होसी भावेंचि तूं मुक्त ।
काय करिसी युक्त जाणिवेची ॥५॥

अर्थ
अन्नाच्या वासाने जर पोट भरले असते तर स्वयंपाक करण्याचे कारणाच काय होते .नुसत्या शब्दाने कधी प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही; त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी रामाचे सतत स्मरण करा .पाणा फक्त पाहुन जर कोणाची तहान भागत असेल तर पाण्याचा साठा का करावा ? वृक्षाची सावली दुरुण पाहुन त्याचा अनुभव घेता येत नाही, त्याखाली बसावे लागते .तसे हरिनाम प्रत्यक्ष गावे, एकावे लागते, त्यावर दृढ़ भक्तीभाव ठेवावा लागतो .तुकाराम महाराज म्हणतात, तू जर दृढ भक्तीभावाने हरिभक्ती केलीस तर तू निश्चितच मुक्त होशील .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.