नव्हतों सावचित – संत तुकाराम अभंग – 197
नव्हतों सावचित ।
तेणें अंतरलें हित ॥१॥
पडिला नामाचा विसर ।
वाढविला संवसार ॥ध्रु.॥
लटिक्याचे पुरीं ।
गेलों वाहोनियां दुरी ॥२॥
तुका म्हणे नाव ।
आम्हां सांपडला भाव ॥३॥
अर्थ
मी परमार्थाविषयी सावचित्त नव्हतो म्हणून माझे अहित झाले .संसार वाढविता वाढविता मला नामाचा विसर पडला .प्रपंच्यातील खोट्या लोभाला भुललो त्यामुळे पर्मार्थापासून दूर गेलो .तुकाराम महाराज म्हणतात , विठ्ठलरूपी नाव(नौका) सापडल्यामुळे या भवसागरातून आम्ही तरुण जाऊ .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नव्हतों सावचित – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.