विट नेघे ऐसें रांधा ।
जेणें बाधा उपजे ना ॥१॥
तरीच तें गोड राहे ।
निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥
आणिकां गुणां पोटीं वाव ।
दावी भाव आपुला ॥२॥
तुका म्हणे शुद्ध जाती ।
ते मागुती परतेना ॥३॥
अर्थ
ज्याचा कंटाळा येणार नाही किंवा जे पोटाला बाधणार नाही, असे अन्न शिजवावे .तरच ते गोड वाटेल व् पचेल .असे रसदार, चविष्ट, पाचक अन्न पोटात गेले तर ते आपल्या शरीरावर प्रभाव दाखवेल .तुकाराम महाराज म्हणतात, असे शुद्ध अन्न सेवन केल्याने शुद्ध भाव, शुद्ध चित्त निर्माण होते .(म्हणजे कर्म असे करावे की जे चांगले असेल व आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला चांगले मिळेल व दुसऱ्याला ही त्याचा फायदा होईल असेच आपण कर्म करावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.