संत तुकाराम अभंग

वासुगीच्या वनीं सीता शोक करी – संत तुकाराम अभंग – 195

वासुगीच्या वनीं सीता शोक करी – संत तुकाराम अभंग – 195


वासुगीच्या वनीं सीता शोक करी ।
कां हों अंतरले रघुनाथ दुरी ।

येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी ।
कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
सांग वो त्रीजटे सखिये ऐसी मात ।
देईल कां नेदी भेटी रघुनाथ ।

मन उतावळि जाला दुरी पंथ ।
राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥
काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें ।
तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें ।

गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें ।
न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥
नाडियेलें आशा मृगकांतिसोने ।
धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें ।

उल्लंघिले आज्ञा माव काय मी जाणें ।
देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥३॥
नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये ।
एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।

उपटी पक्षिया एक देउनि पाये ।
उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥४॥
जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी ।
चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।

संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी ।
येईल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥

अर्थ
रावणाने सीतेचे हरण केले व सीतेला वासुकीच्या वनांमध्ये आणून ठेवले त्यावेळेस सीता शोक करत त्रिजटेला म्हणते हे त्रिजटे का बरे रघुनाथ माझ्यापासून दूर अंतरले असतील, मी माझ्या पर्णकुटी मध्ये होते दुष्ट रावण तेथे आला व माझे हरण केले आणि अवघड अशा अलंकापुरी मध्ये मला त्याने का बरे आणले? हे माझे सखये त्रिजटे मला सांग माझे रघुनाथ मला भेट देतील की नाही, रघुनाथाना भेटण्यासाठी माझे मन फार उताविळ झाले आहेत परंतु ते तर माझ्यापासून खूप दूर आहेत आणि आता माझा प्राण देखील या कुडीत राहीनासा झाला आहे. हे सखये मी असे कोणते दुष्ट आचरण केले होते किंवा कोणाची तीर्थ किंवा व्रत भंग केले होते काय, हे सखे मी कधी गाई आणि वासरू किंवा पत्नी आणि पती यांची ताटातूट केली होती काय मला माझे संचित काही कळेनासे झाले आहे का बरे मला रघुनाथांच्या चरणांचे अंतर पडले असेल? सोन्यासारखी कांती हरणा मुळे मी फसले मला वाटले त्या हरणाच्या कातड्याची चोळी करून घालावे त्यामुळे मी रघुनाथ यांना त्या हरणाच्या पाठीमागे पाठविले. लक्ष्मणाच्या आज्ञेचे उल्लंघन केले मला काय माहित त्या दृष्टा ची माया काय आहे, मी लक्ष्मण रेषेचे उल्लंघन करताच रावण रुपी कुत्रे यांनी माझे अपहरण केले. हे माय एका रघुनाथा वाचून मला दुसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही. मला सोडवण्यासाठी जटायू पक्षाने धाव घेतली त्यावेळी रावणाने जटायू च्या अंगावर पाय देऊन त्याचे दोन्ही पंख उपटून टाकले जटायू पक्षी पाण्याच्या वेढ्यामध्ये पडला त्यामुळे माझेही तेथे काहीच चालले नाही. तुकाराम महाराज म्हणतात जनकाची मुलगी जानकी अशाप्रकारे दुःखाने वेढली गेली हरणाची व पाडसाची जशी चुकामुक व्हावी अशा प्रकारची स्थिति जानकीची झाली त्यावेळी त्रिजटा सीतेला शांत करत म्हणाली सिते शांत हो तुकयाचा स्वामी राम अलंकापुरी ला येईल आणि संपूर्ण अलंकापुरी जिंकून घेईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


वासुगीच्या वनीं सीता शोक करी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *