आसुरी स्वभाव निर्दय अंतर – संत तुकाराम अभंग – 194
आसुरी स्वभाव निर्दय अंतर ।
मानसीं निष्ठुर अतिवादी ॥१॥
याति कुळ येथें असे अप्रमाण ।
गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥
काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग ।
अंगाचेंच अंग साक्षी देतें ॥२॥
तुका म्हणे बरी जातीसवें भेटी ।
नवनीत पोटीं सांठविलें ॥३॥
अर्थ
एखादा मनुष्य अंतकरणात राक्षसी स्वभावाचा, निर्दयीअसेल तर मग तो कितीही श्रेष्ट, उच्च कुळातील असला तरी व्यर्थ! कारण कुळापेक्षा गुणांना ज्यास्त महत्त्व आहे.पीतळ आणि सोने पिवळ्या रंगाचे असले तरी पितळाला डाग पडतात, सोन्याला नाही,सोने या धातूच्या अंगाचे गुणच येथे साक्षी ठरतात .तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने भक्तीचे नवनीत पोटात म्हणजे अंतकरणात साठविले आहे, तो श्रेष्ठ, उच्च जातिकुळातील मानाव आहे, त्याची भेट घ्यावी .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आसुरी स्वभाव निर्दय अंतर – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.