स्वप्नीचिया गोष्टी ।
मज धरिलें होतें वेठी ।
जालिया शेवटीं ।
जागे लटिकें सकळ ॥१॥
वायां भाकिली करुणा ।
मूळ पावावया शीणा ।
राव रंक राणा ।
कैंचे स्थानावरी आहे ॥ध्रु.॥
सोसिलें तें अंगें ।
खरें होतें नव्हतां जागें ।
अनुभव ही सांगे ।
दुःखें डोळे उघडीले ॥२॥
तुका म्हणे संतीं ।
सावचित केलें अंतीं ।
नाहीं तरि होती ।
टाळी बैसोनि राहिली ॥३॥
अर्थ
अज्ञानाच्या निद्रेत मला जन्म-मृत्युने वेठिला धरले होते, ब्रम्हज्ञानाची जागृति आल्यावर शेवटी या गोष्टी खोट्या ठरल्या.मी विनाकारणच व्यर्थ हरीला जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी करून भाकणे कारण खरे पाहिले तर हे जग म्हणजे एक प्रकारचे स्वप्नच आहे, हे मला नंतर कळुन चुकले, की ही अवस्था प्राप्त होण्यासाठी गरीब-श्रीमंत असा भेदाभाव केला जात नाही .प्रपंच्यात सुख दुःख, वेदना सहन केल्या; पण त्या स्वप्नवत वाटल्या.प्रपंच्यातील दुःखमुळेच परमार्थाकडे वळलो आणि ब्रम्हज्ञानाची प्राप्ती झाली .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच्यातुन बाहेर पडण्यासाठी मला संतांनी मोलाची मदत केली, त्यामुळे मला ब्रम्हज्ञान प्राप्त झाले, नाहीतर हरिभक्तीविना मी तसाच प्रपंच्यात अडकून पडलो असतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.