पूजा समाधान ।
अतिशय वाढे सीण ॥१॥
हें तों जाणां तुम्ही संत ।
आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥
पहिले पाहिजे तें केलें ।
सहज प्रसंगीं घडलें ॥२॥
तुका म्हणे माथा ।
पायीं माझा तुम्हां संतां ॥३॥
अर्थ
साधुची वृत्ती समाधानी असली पाहिजे अन्यथा लोकांकडून अपमान होतो .हे संतसज्जनहो, तुम्हीही अशीच वृत्ती ठेवा.नितीने वागणे हेच साधुत्व आहे .परमार्थ तुम्ही सहजपणे केला पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या नीतिमान संतांच्या पायांवर मी माझा माथा ठेवतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.