म्हणवितों दास – संत तुकाराम अभंग – 191

म्हणवितों दास – संत तुकाराम अभंग – 191


म्हणवितों दास ।
मज एवढीच आस ॥१॥
परी ते अंगीं नाहीं वर्म ।
करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥
बडबडितों तोंडें ।
रितें भावेंविण धेंडें ॥२॥
तुका म्हणे बरा ।
दावूं जाणतों पसारा ॥३॥

अर्थ
हे विठ्ठला, मला तुझा दास म्हणवुन घेण्याची इच्छा आहे .खरा दास कसा बनतो, याचे रहस्य मला माहीत नाही; पण तू आपला पतितांना पावन करण्याचा धर्म पाळ आणि मला तुझा दास करून घे .माझी बडबड म्हणजे भक्तीभावाविन केलेली पोकळ वाचळता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचे ढोंग मी करू शकतो; पण भक्तीचे योग्य वर्म मी जाणत नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


म्हणवितों दास – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.