ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे – संत तुकाराम अभंग – 19

ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे – संत तुकाराम अभंग – 19


ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे ।
बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ ।
जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥
कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं ।
इच्छेचिये वाही वरुषावे ॥२॥
बैसलिये ठायीं लागलें भरतें ।
त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥३॥
हरी नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं ।
नारायण अंगीं विसावला ॥४॥
तुका म्हणे बहु लाटे हें भोजन ।
नाहीं रिता कोण राहत राहों ॥५॥

अर्थ
ब्रम्हादिक देवसुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या लाभाला पारखे झाले, तो लाभ आम्हाला मिळाला आहे आम्ही परमेश्वराला शरणागत आम्ही आहोत, म्हणून बलवान आहोत .आम्ही विषय वासनेचा त्याग केल्यामुळे या भजनांचा लाभ आम्हाला झाला आहे आमच्या भक्ति मुळे हा परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे .कामधेनुच्या दुधला अंत नाही, याचकाच्या मर्जी प्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते, तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो .परमेश्वरप्रेमाचे असे भरते आमच्या मनामधे निर्माण झाले आहे ,की त्यामुळे त्रिपुटिंचाहि भेद करता येतो .आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास आसल्यामुळे आम्हाला हार मनण्याची माहित नाही; कारण आम्ही विष्णुदास आहोत .या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळे विचारी मनुष्य उपवाशी राहत नाही अविचारी मनुष्य भक्तिप्रेमाला मुकला आहे .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.