कार्तिकीचा सोहळा – संत तुकाराम अभंग – 188

कार्तिकीचा सोहळा – संत तुकाराम अभंग – 188


कार्तिकीचा सोहळा ।
चला जाऊं पाहूं डोळां ।
आले वैकुंठ जवळां ।
सन्निध पंढरीये ॥१॥
पीक पिकलें घुमरी ।
प्रेम न समाये अंबरीं ।
अवघी मातली पंढरी ।
घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥
चालती स्थिर स्थिर ।
गरुड टकयांचे भार ।
गर्जती गंभीर ।
टाळ श्रुति मृदंग ॥२॥
मिळालिया भद्रजाती ।
कैशा आनंदें डुल्लती ।
शूर उठावती ।
एक एका आगळे ॥३॥
नामामृत कल्लोळ ।
वृंदें कोंदलीं सकळ ।
आले वैष्णवदळ ।
कळिकाळ कांपती ॥४॥
आस करिती ब्रम्हादिक ।
देखुनि वाळवंटीचें सुख ।
धन्य धन्य मृत्युलोक ।
म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥
मरण मुक्ती वाराणसी ।
पितृॠण गया नासी ।
उधार नाहीं पंढरीसि ।
पायापाशीं विठोबाच्या ॥६॥
तुका म्हणे आतां ।
काय करणें आम्हां चिंता ।
सकळ सिद्धींचा दाता ।
तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥

अर्थ
साधकाहो, आपल्या डोळ्यांनी आपण कार्तिकिचा सोहळा पाहू चला.पंढरीच्या जवळ साक्षात वैकुंठच् आहे .तेथे हरिनामाचे अपार पिक पिकले आहे.प्रेम गगनात मावेनासे झाले आहे.सारी पंढरी त्यात मस्त झाली आहे.घरोघरी सुकाळ झाला आहे .भक्तगण स्थिरपणे चालले आहेत.गरुडध्वजांचे भार त्यांच्याजवळ आहेत.टाळ,मृदुंगाच्या नादात गंभीरपने नामघोष करीत आहेत .हत्तीचा कळप जसा डोलत असावा , त्याप्रमाणे एकाहुन एक श्रेष्ठ असे विष्णुभक्त आनंदाने डोलत आहेत .श्रीहरिच्या नामामृताच्या घोषत भक्तसमुदाय कोंडाटूंन गेला आहे आणि अश्या प्रकारे हे विष्णुदासांचे सैन्य आलेले पाहुन कळिकाळालाही कंप सुटला आहे .पंढरीतील वाळवंटामधील हे सुख पाहुन ब्रह्मादिकदेवहि त्याची इच्छ करीत आहेत, हा मृत्युलोक धन्य आहे, येथील लोक भाग्यवंत आहेत, असे ते म्हणतात .काशीत मरण आलेतर मुक्ती मिळते, गया वर्जन केल्याने पितृऋनातून मुक्तता मिळते, पंढरीत विठ्ठालाच्या चरणापाशी मात्र अशा प्रकारची उधारी नसते तिथे सर्वकाही रोखण्याचा मिळते .तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला चिंता करण्याचे कारण काय? सर्व सिद्धी देणारा श्रीहरी आमची कधीही अपेक्षा करणार नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


कार्तिकीचा सोहळा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.