संत तुकाराम अभंग

मार्गी बहुत – संत तुकाराम अभंग – 187

मार्गी बहुत – संत तुकाराम अभंग – 187


मार्गी बहुत ।
याचि गेले साधुसंत ॥१॥
नका जाऊ आडराणें ।
ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥
चोखाळिल्या वाटा ।
न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥
झळकती पताका ।
गरुडटके म्हणे तुका ॥३॥

अर्थ
या पूर्वी या भक्तीमार्गाने अनेक साधुसंत गेले आहेत .प्रपंचातील आडवाटीने तुम्ही जावु नका , असे पुराणे गर्जना करून सांगतात .पुढे गेलेल्या संतानी या वाटा स्वच्छ केल्या आहेत, त्यामुळे कोणालाही न विचारता या धोपटमार्गावरून जाता येते .तुकाराम महाराज म्हणतात , या मार्गावरून जाणाऱ्या विष्णुदासांच्या खांद्यावर गरुड चिन्हांकित पताका झळकतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


मार्गी बहुत – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *