वैद्य वाचविती जीवा – संत तुकाराम अभंग – 186

वैद्य वाचविती जीवा – संत तुकाराम अभंग – 186


वैद्य वाचविती जीवा ।
तरी कोण ध्यातें देवा ॥१॥
काय जाणों कैसी परी ।
प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥
अंगी दैवत संचरे ।
मग तेणे काय उरे ॥२॥
नवसें कन्यापुत्र होती ।
तरि कां करणें लागे पती ॥३॥
जाणे हा विचार ।
स्वामी तुकयाचा दातार ॥४॥

अर्थ
वैद्यानेच जर माणसाचा जीव वाचवला असता तर देवाचे ध्यान कोणी केले असते.मनुष्य देह जरी कार्यशील असला तरी सारे काही प्रारब्धावर असते.जर अंगात दैवताचा संचार होतो तर तेथे काही उरत नाही.नवसाने जर मूल बाळ होत असेल तर नवरा करायची काय गरज.तुकाराम महाराज म्हणतात जो सर्वांचा दातार आहे हा विठ्ठलच हे सर्व विचार जाणत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


वैद्य वाचविती जीवा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.