शोधिसील मूळें – संत तुकाराम अभंग – 185

शोधिसील मूळें – संत तुकाराम अभंग – 185


शोधिसील मूळें ।
त्याचें करीसी वाटोळें ॥१॥
ऐसे संतांचे बोभाट ।
तुझे बहु झाले तट ॥ध्रु.॥
लौकिका बाहेरी ।
घाली रोंखीं जया धरी ॥२॥
तुका म्हणे गुण ।
तुझा लागलिया शून्य ॥३॥

अर्थ
परमेश्वर आपल्या भक्तांच्या अज्ञानाचे मूळ शोधून त्यांना ज्ञानप्राप्ती करुण देतो; त्यामुळे त्याचे वाटोळे होते .असा तुझ्या नावलौकिकाचा बोभाटा संतानी करून ठेवला आहे .जो प्रपंच्याला सोडून परमार्थ मार्गाला आला, तो सामाजीकदृष्टया लौकिकाबाहेर गेला .तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरी गुण ज्या जीवाला लागला त्याला शून्य ब्रह्मावस्था निर्माण झाली .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


शोधिसील मूळें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.