देव होईजेत देवाचे संगती – संत तुकाराम अभंग – 184
देव होईजेत देवाचे संगती ।
पतन पंगती जगाचिया ॥१॥
दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा ।
करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥
दाखविले परी नाहीं वरीजितां ।
आला तोचि चित्ता भाग वरी ॥२॥
तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ ।
उपदेश मूळ बीजमात्र ॥३॥
अर्थ
देवाच्या, संतांच्या संगतिने जीव देवस्वरूप होतो; पण प्रपंचिकाच्या संगतीने मात्र अध:पतन घडते .प्रपंच्य व परमार्थ या सदगति व अधोगतिच्या दोन वाटा आहेत, या मार्गाने जे जिव जातील ते आपल्या मार्गाप्रमाणे पाप-पुण्याचा संचय करीत जातील .आम्ही दोन्ही मार्ग लोकांना दाखवितो, ज्याला जो मार्ग योग्य वाटला, त्या मार्गाने तो गेला .तुकाराम माहाराज म्हणतात, ज्या जीवाला परमार्थाची आवड आहे, त्यालाच पारमार्थिक उपदेश केला तर तो सफल होतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
देव होईजेत देवाचे संगती – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.