पुण्यवंत व्हावें – संत तुकाराम अभंग – 183

पुण्यवंत व्हावें – संत तुकाराम अभंग – 183


पुण्यवंत व्हावें ।
घेतां सज्जनांची नांवें ॥१॥
नेघे माझे वाचे तुटी ।
महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥
विश्रांतीचा ठाव ।
पायीं संतांचिया भाव ॥२॥
तुका म्हणे पापें ।
जाती संतांचिया जपें ॥३॥

अर्थ
संतसज्जनांची फक्त नावे उच्चारल्याने पुण्यसंचय होतो .त्यामुळे माझी वाणी पुण्यसंचय करुण घेणार आहे, हा फुकटचा लाभ दवडण्यास ती तयार नाही .संतचरणाजवळ खरा भक्तीभाव ठेवला असता जीवाला विसावा मिळतो .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या प्रकारचे संतांच्या नामस्मरामुळे पाप नाहीसे होते .


बोलावें तें धर्मा मिळे – संत तुकाराम अभंग


बोलावें तें धर्मा मिळे ।
बरे डोळे उघडूनि ॥१॥
काशासाठीं खावें शेण ।
जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥
दुजें ऐसें काय बळी ।
जें या जाळी अग्नीसि ॥२॥
तुका म्हणे शूर रणीं ।
गांढें मनीं बुरबुरी ॥३॥

अर्थ
बोलताना डोळसणाने, धर्मसंकेतानुसार बोलावे . नाही तर बोलू नये ते आणि जर बोललो तर लोक आपल्यावर थुंकतील .आपण इतके बलवान आहोत का की या समाजपुरुषाला जाळु ? .तुकाराम महाराज म्हणतात , शुर मनुष्य राणांगनावर शस्त्रसज्ज होऊन उभा राहतो, तर भित्रा मनुष्य घरात नुसत्या बढाया मारतो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


पुण्यवंत व्हावें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.