संत तुकाराम अभंग

गहूं एकजाती – संत तुकाराम अभंग – 182

गहूं एकजाती – संत तुकाराम अभंग – 182


गहूं एकजाती ।
परी त्या पाधाणी नासिती ॥१॥
वर्म जाणावें तें सार ।
कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥
कमाईच्या सार ।
जाति दाविती प्रकार ॥२॥
तुका म्हणे मोल ।
गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥

अर्थ
गव्हाचे अनेक खाद्य प्रकार तयार करता येतात .स्वयंपाक करणारी जर सुगरण नसेल तर ती गव्हाचा नास करेल .म्हणून पदार्थाचे गुणधर्म व त्याच वर्म ओळखून कुशलतेने त्याचा उपयोग करून घ्यावा . अनेक प्रकारच्या जातीचे धान्य असतात व त्याचे विविध प्रकारचे खादय पदार्थ तयार करणे यात खरी कुशलता आहे.तुकाराम महाराज म्हणतात, की प्रत्येकातील गुणाला महत्त्व दिल पाहिजे, तेथे नुसती बडबड उपयोगाची नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


गहूं एकजाती – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *