तुझें वर्म ठावें ।
माझ्या पाडियेलें भावें ॥१॥
रूप कासवाचे परी ।
धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥
नेदी होऊं तुटी ।
मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥
तुका म्हणे देवा ।
चिंतन हे तुझी सेवा ॥३॥
अर्थ
माझ्या भक्तीभावामुळे तुझे रूप, रहस्य मला सापडले आहे .कासव जैसे आपले अवयव पोटाशी आवळून घेतो, तसे तुझे रूप मी ह्रदयाशी धरले आहे .या आपल्या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होणार नाही.तुझ्या दृष्टिशी माझी दृष्टी एकरूप होईल .तुकाराम महाराज म्हणतात, आता यापुढे तुझे चिंतन आणि सेवा हेच माझे जीवन, हेच सत्य आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.