ठायींची ओळखी ।
येईल टाकुं टाका सुखीं ॥१॥
तुमचे जाईल ईमान ।
माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥
ठेविला तो ठेवा ।
अभिलाष बुडवावा ॥२॥
मनीं न विचारा ।
तुका म्हणे हे दातारा ॥३॥
अर्थ
हे देवा तुमची व माझी हि मुळची ओळख आहे.ही गोष्ट तूम्ही विसरत असाल तर विसरा.पण त्यामुळे तुमचे इनाम जाईल आणि माझ्या कपाळी पतन येईल.म्हणजे हे असे होईल एखाद्या जवळ आपला ठेवा ठेवला आणि त्याने तो ठेवा अभिलाषे पोटी बुडवावा.तुकाराम महाराज म्हणतात आहो दातारा या गोष्टीचा विचार तुम्ही मनात का करत नाही?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.