कृपा करुनी देवा – संत तुकाराम अभंग – 179
कृपा करुनी देवा ।
मज साच तें दाखवा ॥१॥
तुम्ही दयावंत कैसे ।
कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥
पाहोनियां डोळां ।
हातीं ओढवाल काळा ॥२॥
तुका म्हणे देवा ।
माझा करावा कुढावा ॥३॥
अर्थ
हे देवा माझ्यावर कृपा करुन जे खरे आहे ते मला दाखवा . असे जर केले नाही तर तुम्ही दयावंत कसले पण तुम्ही दयावंत आहात हि तुमची कीर्ती तर सर्व जगामध्ये आहे .देवा आम्हा भक्तांना जर तुम्ही तुमच्या डोळया देखत काळाच्या हाती आम्हाला देत असाल तर तुमची कीर्ती ति कसली? तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे रक्षणखरोखर तुम्ही करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कृपा करुनी देवा – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.