दाता नारायण – संत तुकाराम अभंग – 178
दाता नारायण ।
स्वयें भोगिता आपण ॥१॥
आतां काय उरलें वाचे ।
पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥
देखती जे डोळे ।
रूप आपुलें तें खेळे ॥२॥
तुका म्हणे नाद ।
झाला अवघा गोविंद ॥३॥
अर्थ
मनुष्याला सर्व सुख देणारा नारायण आहे आणि उपभोगणाराहि तोच आहे .त्यामुळे माणसाला बोलायला पुढे जागच् राहिली नाही .आपले डोळ्यांना दिसणारे रूप हे सर्व काही तोच आहे .तुकाराम महाराज म्हणतात, मुखातून निघणारे शब्द आणि ते शब्द श्रवण करणारे कान, शब्दांचा नाद सर्व काही गोविंदच आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
दाता नारायण – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.