संत तुकाराम अभंग

बोलावें तें धर्मा मिळे – संत तुकाराम अभंग – 177

बोलावें तें धर्मा मिळे – संत  तुकाराम अभंग – 177


बोलावें तें धर्मा मिळे ।
बरे डोळे उघडूनि ॥१॥
काशासाठीं खावें शेण ।
जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥
दुजें ऐसें काय बळी ।
जें या जाळी अग्नीसि ॥२॥
तुका म्हणे शूर रणीं ।
गांढें मनीं बुरबुरी ॥३॥

अर्थ
बोलताना डोळसणाने, धर्मसंकेतानुसार बोलावे . नाही तर बोलू नये ते आणि जर बोललो तर लोक आपल्यावर थुंकतील .आपण इतके बलवान आहोत का की या समाजपुरुषाला जाळु ? .तुकाराम महाराज म्हणतात , शुर मनुष्य राणांगनावर शस्त्रसज्ज होऊन उभा राहतो, तर भित्रा मनुष्य घरात नुसत्या बढाया मारतो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


बोलावें तें धर्मा मिळे – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *