उजळावया आलों वाटा – संत तुकाराम अभंग – 176

उजळावया आलों वाटा – संत तुकाराम अभंग – 176


उजळावया आलों वाटा ।
खरा खोटा निवाडा ॥१॥
बोलविले बोलें बोल ।
धनी विठ्ठल सन्निध ॥ध्रु.॥
तरी मनीं नाहीं शंका ।
बळें एका स्वामीच्या ॥२॥
तुका म्हणे नये आम्हां ।
पुढें कामा गाबाळ ॥३॥

अर्थ
मी प्रपंच्याकडून परमर्थाकडे जाणारी वाट उजळविण्यासाठी व सत्य-असत्य सांगण्यासाठी आलो आहे .माझा बोलविता धनी तो विठ्ठल आहे.तो जसे बोलवितो, तसे मी बोलतो .त्यामुळे माझ्या विठोबाच्या सल्यानुसार असणाऱ्या माझ्या बोलाविषयी तुम्ही शंका घेऊ नका .तुकाराम महाराज म्हणतात, की हरिभक्तांमध्ये अडथळा आणणारी गबाळ साधने आम्हाला चालणार नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


उजळावया आलों वाटा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.