विधीनें सेवन – संत तुकाराम अभंग – 174

विधीनें सेवन – संत तुकाराम अभंग – 174


विधीनें सेवन ।
विषयत्यागातें समान ॥१॥
मुख्य धर्म देव चित्तीं ।
आदि अवसानी अंतीं ॥ध्रु.॥
बहु अतिशय खोटा ।
तर्के होती बहु वाटा ॥२॥
तुका म्हणे भावें ।
कृपा करीजेते देवें ॥३॥

अर्थ
ज्या प्रमाणे शास्त्राने म्हणजे विधीने सांगीतलेल्या नियमाने विषयाचे सेवन केले तर तो त्यागाच असतो.सर्वात मुख्य धर्म म्हणजे चित्ता मध्ये भगवंत असणे होय.व तो हि आदी अंती असावा.तर्क आणि कुतर्क यांना अनेक वाटा आहे पण त्या अतिशय खोट्या आहे.तुकाराम महाराज म्हणतात हरी चरणी पूर्ण पणे भाव असेल तर तो नक्की कृपा करणार.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


विधीनें सेवन – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.