वेदाचें गव्हर न कळे पाठकां – संत तुकाराम अभंग – 173

वेदाचें गव्हर न कळे पाठकां – संत तुकाराम अभंग – 173


वेदाचें गव्हर न कळे पाठकां ।
अधिकार लोकां नाहीं येर ॥१॥
विठोबाचें नाम सुलभ सोपेरें ।
तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ ।
येर तो सकळ मूढ लोक ॥२॥
तुका म्हणे विधि निषेध लोपला ।
उच्छेद या झाला मारगाचा ॥३॥

अर्थ
वेदपठण करणाऱ्या सर्व पंडिताना वेदाचा सार कळतोच असे नाही, इतरांना वेद पाठणाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेदाचे सार काळण्याचा संबंधच येत नाही .विठ्ठलाचे नाम हे सुलभ-सोपे आहे, भवसागर पार करणारे आहे, ते घेण्याचा अधिकार सर्वांना आहे .मंत्रतंत्र जाणणाऱ्या जाणकारांना कर्मकांड परिपुर्णरीत्या साध्य होत नाही, तर इतराना कसे समजणार ? .तुकाराम महाराज म्हणतात, वेदांमधील विधिनिषेध लोप पावल्यामुळे या मार्गाचा उच्छेद झाला आहे, त्यामुळे कलियुगात नामभक्तीवीणा दूसरा पर्‍याय नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


वेदाचें गव्हर न कळे पाठकां – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.