इनामाची भरली पेठ – संत तुकाराम अभंग – 172

इनामाची भरली पेठ – संत तुकाराम अभंग – 172


इनामाची भरली पेठ ।
वाहाती दाट मारग ॥१॥
अवघेची येती वाण ।
अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥
अडचणी त्या केल्या दुरी ।
देण्या उरी घेण्याच्या ॥२॥
तुका म्हणे जोडी झाली ।
ते आपुली आपणा ॥३॥

अर्थ
पंढरी क्षेत्र ही भक्तांच्या इनामाची पेठ आहे,तेथील सर्व मार्ग भक्तांनि भरून वाहत आहेत .मानवी जीवनाचे सार्थक करणारे चारि पुरुषार्थ स्वरुप या पेठेत विकावयास आले आहेत, त्याचा लाभ होण्याचे शुभ शकुन होत आहेत .या पेठेतील व्यापार्‍याच्या सर्व समस्या दूर झाल्याने देणे-घेणे सहजसोपे झाले आहे .तुकाराम महाराज म्हणतात कि, या पेठेत् येणाऱ्या भक्तानां आत्मज्ञान स्वरूपाचा लाभ होतो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


इनामाची भरली पेठ – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.