करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे ।
मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥
शुद्धबुद्धि होय दोघां एक मान ।
चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥
आपुलें देऊनी आपुलाचि घात ।
शन करावा थीत जाणोनियां ॥२॥
देऊनियां वेच धाडी वाराणसी ।
नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग ।
भक्ति हे मार्ग मोडूं नये ॥४॥
अर्थ
एखाद्या व्यक्तीने दुसर्याला एकादशी व्रत करावयास लावणे तर तो अर्ध्या पुण्याचा वाटेकरि होतो, पण व्रत मोडवले गेले की ते दोघेही नरकात जातात .सद्बुद्धि असलेल्या माणसाची संगती केली की मानसंन्नमान मिळतो, चोरांची संगती केली तर शिक्षा मिळते .आपल्या जवाळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करुण घेऊ नये , आपले हित ओळखावे .सद्बुद्धि असलेल्या माणसाला काशी-वाराणसीला जाण्यास मदत करावी-पण चोराला ज्योतिषाने चंद्रबळ (चोरीची वेळ) सांगू नये .तुकाराम महाराज म्हणतात, तप, तीर्थ, व्रत, यज्ञयाग हे भक्तीमार्ग आहेत.हे कधी सोडु नये .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.