कर कटावरी तुळसीच्या माळा – संत तुकाराम अभंग – 17
कर कटावरी तुळसीच्या माळा ।
ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली ।
दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी ।
आठवें मानसीं तेचि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां ।
येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस ।
विनंती उदास करूं नये ॥५॥
अर्थ
विठुराया कमरेवर हात ठेऊन, गळ्यात तुळशिमाळा धारण करून उभा आहे, हे हरी असे रूप मला वारंवार दाखव .दोन्ही पाय विटेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे .कमरेला पितांबर कास शोभून दिसते आहे असे रूप मला दाखव .गरुड पारावार उभे असलेले तुझे रूप मला नेहमी अठवते .या गोड सरूपाच्या आठवानीने माझे शरिर अस्थिपंजर बनु लागले आहे तेव्हा हे पंढरी राया, मला भेटायला ये .तुकाराम महाराज म्हणतात, की माझी एवढी आस पूर्ण करावी माझ्या प्राथनेचा अव्हेर करू नये.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कर कटावरी तुळसीच्या माळा – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.