भजन घाली भोगावरी – संत तुकाराम अभंग – 169

भजन घाली भोगावरी – संत तुकाराम अभंग – 169


भजन घाली भोगावरी ।
अकर्तव्य मनीं धरी ॥१॥
धिग त्याचें साधुपण ।
विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥
नाहीं वैराग्याचा लेश ।
अर्थचाड जीवी आस ॥२॥
हें ना तैसे जालें ।
तुका म्हणे वांयां गेलें ॥३॥

अर्थ
देवाचे भजन-पूजन हे माझ्या नाशिबि नाही, असे म्हणत, संसाराची आसक्ती धरणारे लोक असतात .अश्या साधुच्या साधुत्वाचा तुकाराम महाराज धिग(धिक्कार) करतात, त्याचे मन विटाळले आहे, असे म्हणतात .अश्या साधुच्या ठिकाणी वैराग्याचा लवलेशही नाही; त्याच्या ठिकाणी उलट धनाची अपेक्षा असते .तुकाराम महाराज म्हणतात, साधुच्या या आसक्तीमुळे त्याचा जन्म वाया जातो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


भजन घाली भोगावरी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.