धिग जीणें तो बाइले आधीन – संत तुकाराम अभंग – 164

धिग जीणें तो बाइले आधीन – सं तुकाराम अभंग – 164


धिग जीणें तो बाइले आधीन ।
परलोक मान नाही दोन्ही ॥१॥
धिग जीणें ज्याचें लोभावरी मन ।
अतीतपूजन घडेचि ना ॥ध्रु.॥
धिग जीणें आळस निद्रा जया फार ।
अमित आहार अघोरिया ॥२॥
धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य ।
झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥
तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक ।
निंदक वादक नरका जाती ॥४॥

अर्थ
जो गृहस्थ पत्नीच्या आहारी गेलेला आहे त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात, त्याला इहलोक व परलोकि मान मिळत नाही .जो मनुष्य सतत लोभाचाच विचार करत असतो, त्याचा हातून अतिथी- पूजा घडत नहीं, त्या मनुष्याचाहि धीक्कार असो .ज्याला आळस,निद्रा, भरपूर आहार याची आवड आहे, त्या पुरुषयाचाहि धिक्कार असो .जो मनुष्य विवेक आणि वैराग्याविना साधुत्वाची अपेक्षा करतो, त्याचाहि धीक्कार असो .तुकाराम महाराज म्हणतात, परनिंदा करणारा आणि निष्कारण वाद घालनाराहि अंती नरकात जातात, त्यांच्याही जीवनाचा धिक्कार असो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


धिग जीणें तो बाइले आधीन – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.