शरण शरण जी हनुमंता ।
तुज आलों रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
शूर आणि धीर ।
स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥
तुका म्हणे रुद्रा ।
अंजनीचिया कुमरा ॥३॥
अर्थ
हनुमंता, तुम्ही प्रभु राम चंद्रांचे सेवक आहात.म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे .हे श्रेष्ट वीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या आम्हाला दाखवा .तुम्ही शुर वीर धैर्यवान आहात.पुरुषार्थ करने तुम्हीच जानता व स्वामीची तत्परतेने सेवा करता .तुकाराम महाराज म्हणतात, हे रुद्र, तुम्ही अंजनिमातेचे सुपुत्र आहात .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.