हनुमंत महाबळी – संत तुकाराम अभंग – 162

हनुमंत महाबळी – संत तुकाराम अभंग – 162


हनुमंत महाबळी ।
रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार ।
वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उड्डाण ।
केलें लंकेचें शोधन ॥२॥
जाळीयेली लंका ।
धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥

अर्थ
महाबलवंत, महापराक्रमी अशा हनुमंताने रावनाची दाढी जाळली होती .त्यांना मी वारंवार, निरंतर नमस्कार करतो .महान अश्या समुद्रावर उड्डाण करुण लंकेचे निरिक्षण केले .तुकाराम महाराज म्हणतात, रावणाची लंका ज्याने जाळली, त्या मारुतिरायाचा पराक्रम धन्य होय .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


हनुमंत महाबळी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.