काम बांदवडी – संत तुकाराम अभंग – 161

काम बांदवडी – संत तुकाराम अभंग – 161


काम बांदवडी ।
काळ घातला तोडरी ॥१॥
तया माझें दंडवत ।
कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥
शरीर वज्रा ऐसें ।
कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥
रामाच्या सेवका ।
शरण आलों म्हणे तुका ॥३॥

अर्थ
देवा, ज्या मारुतिरायाने कामाला जिंकून बंदीवासात ठेवले, कळाला बेडया ठोकल्या .त्या कपिकुळातील हनुमंताला माझा दंडवत असो .ज्याचे शारीर वज्रा सारखे आहे, आपल्या शेपटीने जो ब्रम्हांडाला वेढा घालू शकतो .तुकाराम महाराज म्हणतात अश्या रामरायाच्या सेवका, तुला मी शरण आलो आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


काम बांदवडी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.