केली सीताशुद्धी – संत तुकाराम अभंग – 160

केली सीताशुद्धी – संत तुकाराम अभंग – 160


केली सीताशुद्धी ।
मूळ रामायणा आधीं ॥१॥
ऐसा प्रतापी गहन ।
सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु.॥
जाऊनि पाताळा ।
केली देवीची अवकळा ॥२॥
राम लक्षुमण ।
नेले आणिले चोरून ॥३॥
जोडूनियां कर ।
उभा सन्मुख समोर ॥४॥
तुका म्हणे जपें ।
वायुसुता जाती पापें ॥५॥

अर्थ
मूळ रामायाणाच्या प्रारंभी मारुती रायाने सितेचा शोध केला, ही कीर्ति वर्णीलि आहे .असा हा हनुमंत महान पराक्रमी असून भक्तांचे भूषण आहे .पातळात् जावून त्याने राक्षसांच्या देवीची फजीती केली .अहिरावण-महिरावण या राक्षसांनी राम लक्ष्मणाला चोरून नेले होते; त्या दृष्टांचा वध करुन मारुतीरायाने राम-लक्ष्मण यांना सोडवून आणले .तो हनुमंत रामा समोर हात जोडून उभा आहे .तुकाराम महाराज म्हणतात, या वायुसुताचा जप केला तर पाप नाहीशी होतात .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


केली सीताशुद्धी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.