राजस सुकुमार – संत तुकाराम अभंग – 16
राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतिलें सकळही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा ।
घननीळ सांवळा बाईयांनो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
अर्थ
राजस, सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतुळा आहे सूर्य-चंद्राच्या प्रभा त्याच्या तेज्यात लपल्या आहे .त्याच्या कपाळि कस्तूरिचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची ऊटी लावलेली आहे गळ्यात वैजयंती माळा रूळत आहे .मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे .त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसले आहे व् भरजरि शेला पांघरला आहे बायानो असा हा विठुराया सवळया रंगाचा आहे .तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सर्व बयांनी एका बाजुला व्हा मझ्या आड येउ नका, श्रीमुख पहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
हरिच्या जागरणा – संत तुकाराम अभंग – 16
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.