आणिकांच्या घातें – संत तुकाराम अभंग – 159

आणिकांच्या घातें – संत तुकाराम अभंग – 159


आणिकांच्या घातें ।
ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥
तेचि ओळखावे पापी ।
निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
कान पसरोनी ।
ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥
तुका म्हणे भांडा ।
धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥३॥

अर्थ
दुसर्‍याचा घात झालेला पाहुन ज्यांना आनंद होतो असे लोक पापी आहे असेच समजावे .शीघ्रकोपि मनुष्य अंती नरकाला जातात .ज्याला परनिंदा, वाइट बोलने ऐकायला, बोलायला आवडते, तोहि पापी आहे .तुकाराम महाराज म्हणतात , भांडखोर व ज्यच्य तोंडाला धैर्य नसलेला मनुष्यही असाच पापी असतो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आणिकांच्या घातें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.