मागें नेणपणें घडलें तें क्षमा – संत तुकाराम अभंग – 158

मागें नेणपणें घडलें तें क्षमा – संत तुकाराम अभंग – 158


मागें नेणपणें घडलें तें क्षमा ।
आतां देतों सीमा करूनियां ॥१॥
परनारीचें जया घडलें गमन ।
दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥
उपदेशा वरी मन नाहीं हातीं ।
तो आम्हां पुढती पाहूं नये ॥२॥
तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन ।
घातली ते आण पाळावया ॥३॥

अर्थ
मागे अजाणतेपणाने तुमच्याकडून काही गुन्हा घडला असेल तर आता पश्चातापाने प्रायश्चित्त घेऊन भक्तीमार्ग धरल्यास आम्ही तुमच्या सर्व चुका माफ करतो .पुन्हा जर अशी परस्त्री अभिलाषा धरल्याचे पाप केले तर मातेशी संग केल्याचे पाप लागेल .चांगला उपदेश केल्यानंतरहि जो सुधारणा करत नाही, त्याचे तोंडहि पाहण्याची आमची इच्छा नाही .तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही केलेले उपदेश पाळण्याची शपथ तुम्ही स्वतःचे मन साक्षी ठेवून घ्या .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


मागें नेणपणें घडलें तें क्षमा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.