संत तुकाराम अभंग

करणें तें देवा – संत तुकाराम अभंग – 157

करणें तें देवा – संत तुकाराम अभंग – 157


करणें तें देवा ।
हेचि एक पावे सेवा ॥१॥
अवघें घडे येणे सांग ।
भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥
हेंचि एक वर्म ।
काय बोलिलो तो धर्म ॥२॥
तुका म्हणे खरें ।
खरें त्रिवाचा उत्तरें ॥३॥

अर्थ
देवाला संतांची भक्ती, सेवा करणे आवडते त्या प्रकारची भक्ती, सेवा मनुष्याने करावी .कारण संत हे त्या परमेश्वराचा अंग आहे .देवाला आपल्याप्रमाने संतांची पूजा केलेली आवडते , हेच धर्माचे रहष्य व खरे वर्म आहे तेच मी सांगत आहे .तुकाराम महाराज म्हणतात, हेच खरे सत्य मी त्रिवार सांगत आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


करणें तें देवा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *